Kirit Somaiya Press Confrance : शिवसेना (Shiv Sena) नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगाव येथील घरावर आज सकाळी आयकर विभागानं (IT Raid) छापा टाकला. यासंदर्भात बोलताना यशवंत जाधव मनी लॉन्ड्रिंग करतात, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. यशवंत जाधव आणि कुटुंबीयांच्या ताब्यात आलेला पैसा यूएईला पाठवण्यात आल्याचंही सोमय्या म्हणाले आहेत. तसेच, यासंदर्भात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासाठी मनी लॉन्ड्रिग करणारा एकच माणूस आहे, असा खळबळजनक आरोप सोमय्यांनी केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की "यशवंत जाधव ज्या पद्धतीने मनी लॉन्ड्रिग करतात, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंचा परिवारही त्याच मार्गावार गेला आहे. उद्धव ठाकरेंनी मे 2020 मध्ये निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतरच ही गोष्ट सुरु झाली. विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करताना मालमत्ता दाखवताना उद्धव ठाकरेंनी 19 बंगले लपवले होते. यामिनी जाधव यांनीही अर्ज सादर करताना कोट्यावधी रुपयांची मालमत्ता लपवली. याची माहिती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिली. अर्ज सादर केल्यानंतर आपोआप तो आयकर विभागाकडे जातो. प्रधान डेवलपर्स नावाच्या शेल कंपनीद्वारे यशवंत जाधव यांनी 15 कोटी रुपये मिळवले. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचे संबंध यशवंत जाधव यांनी घोषित केले."
"उदय शंकर महावार हा गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे. सोनिया गांधी परिवाराचे मनी लॉन्डिरग करणारा उदय महावार आहे. गांधी परिवारानेच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची भेट घालून दिली असेल. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी महापालिकेचे फंड गोळा करणारे यशवंत जाधव यांच्यासोबत भेट करुन दिली असेल या बद्दल माहिती नाही. सोनिया गांधीच्या नॅशनल हेरॉल्डमध्ये मनी लॉन्डिरग उदय शंकर महावारने केले आहे. ज्या कंपनीला शेल कंपनी घोषित करण्यात आले त्यांना पैसे देऊन यशवंत जाधव यांच्या परिवाराने पैसे देऊन चेक घेतले आणि त्यावर तीन कंपन्या तयार करण्यात आल्या.", असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
"उदय महावार यांनी सांगितलं आहे की, यशवंत जाधव यांचा माणूस पैसे द्यायचा. ते आम्ही बॅंकेत टाकत होतो आणि तो व्यक्ती चेक घेऊन जात होता. 15 कोटी रुपये यशवंत जाधव यांच्या खात्यामध्ये यायचे आणि त्याताली काही पैसा परदेशात पाठवण्यात आला. ही माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली. त्यानंतर सर्वांकडे गेले अनेक महिने आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. त्यानंतर आज कारवाई सुरु केली आहे.", असे किरीट सोमय्या म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना!
मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाकडून यशवंत चव्हाणांच्या घरी छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Shivsena Corporator Yashwant Jadhav : केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना! BMC नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणा
- Kirit Somaiya : यशवंत जाधवांनी मनी लाँड्रिंग केलं, तर महापौरांनी SRA सदनिका हडपल्या; किरीट सोमय्यांचा घणाघात
- Shivsena Corporator Yashwant Jadhav : यापूर्वीही यशवंत जाधवांवर झाली होती आयकर विभागाची कारवाई; काय आहे नेमकं प्रकरण?