मुंबई :  अंधेरी पश्चिम येथील  लोखंडवाला परिसरात (Andheri Fire)  इमारतीच्या दहाव्या मजल्याला लागलेल्या  घरातील तिघांचा होरपळून मृत्यू झाला.   या आगीमध्ये घरात असलेले दोन वयस्कर नागरिक आणि एक नोकर होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाह मात्र मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या आगीचा तपास करताना ओशिवरा पोलिसांना आणि अग्निशमन दलाचा अधिकाऱ्यांना काही  संशयास्पद वस्तू आढळल्याने संशय आला आहे.  


मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत लोखंडवाला परिसरात  रिया पॅलेस या इमारतीला बुधवारी मोठी आग लागली . सकाळी 7:30 च्या सुमारास लोखंडवाला परिसरात रिया पॅलेस इमारतीचा दहावा मजल्यावर एका घरामध्ये  मोठी आग लागली होती. चंद्रकांत सोनी (76 वर्ष), कांता सोनी ( 71 वर्ष)  नोकर रवी ( 33 वर्ष) या तिघांचा आगीमध्ये जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळ दाखल होऊन तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृत जोडप्याचा मुलगा परदेशात वास्तव्यास आहे.  


टर्पेंटाईनचा डबा आढळला


ही आग विझवताना काही संशयास्पद बाबी निदर्शनास आल्या असून अग्निशमन दलाने याबाबत पोलिसांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलेले नाही. तसेच घटनास्थळी टपेंटाईनचा डबाही सापडल्यामुळे संशय बळावला आहे. इमारतीतील रहिवाशांनीही या आगीबाबत शंका उपस्थित केली आहे.  टर्पेंटाईन हे ज्वलनशील असते. टर्पेन्टाइन तेल साबण आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते आणि पेंट सॉल्व्हेंट म्हणून देखील वापरले जाते आणि ते गिळल्यास  विषारी असते.


मुलगा परदेशात वास्तव्यास


लोखंडवाला संकुलातील रिया पॅलेस या 14 मजली इमारतीमधली दहाव्या मजल्यावरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते.वृद्ध दामप्त्याचा मृत्यू आगीत होरपळल्याने झाला तर नोकराचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याची शक्यता आहे. मुलगा परदेशात असल्याने दाम्पत्य अनेक वर्षे दाम्पत्य एकटेच येथे राहत होते. 


हे ही वाचा :


दार उघडताच आगीचा लोळ अंगावर आला, 7 वर्षांच्या चिमुकलीला कवटाळून मारल्या उड्या; चेंबूरमधील ते कुटुंब थोडक्यात वाचलं