Mumbai Local Megablock Updates: सणासुदीच्या खरेदीसाठी आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज रविवार 3 सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनानं मेगाब्लॉक घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 


मध्य रेल्वेवर आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गांवरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन  त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील.  ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि  नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.


ठाणे येथून सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून 46 मिनिटांपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरानं पोहोचतील.


मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11 वाजून 15 मिनिटं ते दुपारी 4 वाजून 15 मिनिटांपर्यंत 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून पनवेल/बेलापूरसाठी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून 28 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी 10 वाजून 37 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून 45 मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मानखुर्द या भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांवरील ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि मेन लाईन सेवा सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत उपलब्ध असतील. या मेंटेनन्स ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.


दरम्यान, मुंबई लोकल मार्गांवरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.