Mumbai Local Mega Block : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांनी आज गरज असेल तरंच मध्य रेल्वेच्या लोकलनं प्रवास करावा, अन्यथा प्रवास टाळावा. कारण आज मध्य रेल्वेवर तब्बल 18 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी सकळी 8 वाजल्यापासून ते मध्यरात्री दोनपर्यंत ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकसाठी लोकलच्या 160 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या ट्रेन्सही आज रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गरज असेल तरचं आज मध्य रेल्वेचा लोकल प्रवास करा.
मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांनी शुक्रवारी या मार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या मंजुरीनंतर या मार्गाच्या कामासाठी आज (रविवारी) 18 तासांचा मेगाब्लॉक घेण्याचं निश्चित करण्यात आलं.
रविवारी मध्य रेल्वेवर सकाळी 8 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याआधी शुक्रवारी मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या पाहणी आणि मंजुरीनंतर हा मेगाब्लॉक घेतला जात आहे. ब्लॉकमुळे कमी लोकल आज धावणार आहेत. तर मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या मार्गिकेचे काम जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पाहा व्हिडीओ : मध्य रेल्वेवर आज 18 तासांचा मेगाब्लॉक, 'या' एक्स्प्रेस रद्द
गेल्या दहा वर्षांपासून ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुदत वाढवून देण्यात आली आहे. पण तरिसुद्धा तांत्रिक अडचणी, भूसंपादन यांसारख्या कारणांमुळे अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली. आता या मार्गिकांच्या कामाला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरु आहे. यापूर्वीही या मार्गिकांच्या कामासाठी मोठा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सप्टेंबर 2021 मध्ये मार्गिकेच्या कामासाठी दहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. यामध्ये सध्याचे रूळ थोडे बाजूला घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या नवीन रुळांसाठी जागा उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेसह अन्य तांत्रिक कामंही मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- BEST Super Saver Plan : बेस्टचे सुपर सेव्हर प्लान; एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन शक्य
- मुंबई पालिकेच्या 117 अधिकाऱ्यांना कोरोना पावला? निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं
- मध्य रेल्वेचे ग्रहण सुटणार? खारेगाव रेल्वे उड्डाणपूल सुरू होण्याची पालिकेची माहिती
- ...म्हणजे लग्नाआधीच वरात! सिडकोकडून नवी मुंबई मेट्रो प्रवासाचे दर जाहीर!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह'