मुंबई : लोकलमधून (Mumbai Local)  प्रवास करताना एका आठवड्यात डोंबिवलीतील दोघांचा मृत्यू झाला आहे.  डोंबिवलीतून मुंबईला कामाला जाणाऱ्या दोघांचा लोकल प्रवासादरम्यान तोल जाऊन मृत्यू झाला आहे. सकाळी कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान  रिया राजगोर या तरुणीचा लोकलमध्ये प्रवास करत असतांना तोल जाऊन मृत्यू झाला तर 23 तारखेला अवधेश दुबे या तरुणाचा डोंबिवली ते  मुंब्रा दरम्यान लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकल अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 


लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी  सकाळी आठ ते  साडे आठच्या सुमारास  कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान रिया शामजी  राजगोरे या तरुणीचा लोकलमध्ये प्रवास करत असतांना तोल जाऊन मृत्यू झाला आहे.  तर 23 एप्रिललाअवधेश दुबे या तरुणाचा डोंबिवली ते मुंब्रा दरम्यान लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  डोंबिवलीत राहणारी  रिया ही  मुंबईमध्ये नोकरीला होती. नेहमी प्रमाणे   सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या लोकलध्ये चढली.मात्र लोकलमध्ये गर्दी असल्याने रियाने दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास केला.कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन ती लोकल मधून खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.


अवधेशचा डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान तोल जाऊन मृत्यू 


डोंबिवलीतील अवधेश दुबे याचाही लोकलमधून प्रवास करताना 23 तारखेला तोल जाऊन मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे अवधेश हा डोंबिवलीतून मुंबईला कामाला जात असताना लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे अवधेशचा डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान तोल जाऊन मृत्यू झाला . विशेष म्हणजे अवधेशचा भाऊ दीपक दुबे याने एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रेल्वेमध्ये दिवसेंदिवस वाढत होताना लोकल वाढवण्याची मागणी केली आणि दुसऱ्याच दिवशी दीपक यांचा भाऊ अवधेशचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे.


जीवनवाहिनी की मृत्यूवाहिनी?


मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमुळे अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जीवनवाहिनी की मृत्यूवाहिनी असा प्रश्न उपस्थित होत आहे.  यापैकी बहुतांश अपघात हे प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे झाले आहेत.  परंतु  दिवसेंदवस वाढणारी गर्दी पाहता लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. एसी लोकलमुळे लोकलच्या फेऱ्या कमी झाल्याचा आरोप देखील प्रवाशांकडून करण्यात येत आहे. कल्याण, डोंबीवलीहून मुंबईला नोकरीसाठी येणाऱ्या संख्या  जास्त आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत लोकलला तोह गर्दी पाहायला मिळते. 


हे ही वाचा :


Thane Crime News : फटका गँगमुळे प्रवाशाने गमावला हात, लोकलच्या दारात उभे राहून मोबाईल फोन वापरणे महागात