मुंबई : देशातील कुपोषणाचा प्रश्न कमी व्हावा यासाठी खाद्यपदार्थांमधील पोषणमूल्य वाढवण्यासाठी मुंबई आयआयटीच्या रिसर्च टीम कडून काम करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेले मायक्रोन्यूट्रियन एकत्र करून पोषक आहार देण्यासाठीच्या या खाद्यावर संशोधन केले आहे. या आहाराची उपयुक्तता मागील सहा महिन्यांपासून आयआयटी मुंबईतील सदस्य, सायन रुग्णलायतील सदस्य, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, सोसायटी फॉर न्युट्रिशन यांच्याकडून अभ्यासली गेली आहे. सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह फोर रुरल एरिया आणि डिपार्टमेंट ऑफ ह्युमिनीटीज अँड सोशल सायन्स यांनी मिळून अशा प्रकारचे खाद्याचे पॅकेट्स तयार केले आहे
राज्य सरकारने वितरित केलेल्या पॅकेटच्या तुलनेत कुपोषण कमी करण्यासाठी हे खाद्य अधिक कार्यक्षम असल्याचे संशोधकांना आढळले. त्यांचे निष्कर्ष मागच्या वर्षी रिव्ह्यू केलेल्या पेडियाट्रिक ऑनकॉल जर्नलमध्ये प्रकाशित झाले.
भारतात पाच वर्षांखालील मुलांमध्ये जवळजवळ 69% मृत्यू कुपोषणामुळे होतात, असे युनिसेफच्या 2019 च्या अहवालात म्हटले आहे. भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजनेसह मुलांमधील कुपोषण दूर करण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. तथापि, या योजना ग्रामीण भागातील मुलांसाठी अधिक योग्य आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.
मुंबईत सुद्धा संशोधकांनी धारावीतील 300 अंगणवाड्यांमध्ये मुलांमध्ये टेक-होम पॅकेट वाटून एक अभ्यास केला. त्यांनी मुंबईतील घरांमध्ये उपमा, खीर आणि झुनका सारख्या घरातील मुलांचा आहार ओळखून पोषणमूल्य वाढविणारा आहाराचे पॅकेट्स तयार केले होते व त्यांना ते आहारात दिले. ही पॅकेट्स दिल्याच्या तीन महिन्यांनंतर, संशोधकांनी मुलांची तपासणी केली आणि शोधून काढले की ज्यांनी या पॅकेट्सचा आहारात वापर केला यामुळे कुपोषण 39.2% कमी झाले आहे.