मुंबईत भरधाव होंडा सिटी कार झाडावर आदळून चौघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2016 03:01 AM (IST)
मुंबई : मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. पश्चिम द्रुतगती मार्गावर मिलन सबेवजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव होंडा सिटी कार रस्त्याशेजारील झाडावर आदळली. यात गाडीतील चौघांना प्राण गमवावे लागले, तर एक जण जखमी आहे. अपघातग्रस्त कार मीरा रोडची असल्याची माहिती आहे. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.