मुंबई : कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय्य यांच्या आडमुठेपणामुळे एका अधिकाऱ्याला आपल्या मुलाचा जीव गमवावा लागला आहे. अत्यंत धक्कादायक अशी घटना मंत्रालयातील कृषी विभागाचे सहसचिव राजेंद्र घाडगे यांच्या बाबतीत घडली आहे.


 

कृषी विभागाचे सहसचिव राजेंद्र घाडगे यांना त्यांच्या मुलाने फोन करुन घरी बोलावले. घाडगे यांचा मुलगा नैराश्यात होता. घरी न आल्यास आत्महत्या करण्याची धमकीही घाडगेंच्या मुलाने त्यांना दिली होती.

 

मात्र, भगवान सहाय्य यांनी घाडगेंना घरी जाण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे घाडगे मुलाच्या बोलावण्यानंतरही घरी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे मुलाने आत्महत्या केल्याचं समजतं आहे.

 

दरम्यान, या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहेत.