Mumbai Hit-And-Run News : मुंबईतील मुलुंड येथे भरधाव ट्रकच्या धडकेत एका महिला शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना मुलुंड येथे घडली. त्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री मुलुंड (पूर्व) येथे एका ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि पळून गेला.


या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती किरकोळ जखमी झाला. या अपघातात त्यांची दोन वर्षांची मुलगी सुखरूप बचावली. अमृता पुनमिया असे मृत महिलेचे नाव असून ती पती विशाल पुनमिया (35) आणि मुलीसोबत मुलुंड (पश्चिम) येथे राहत होती. ती एका खाजगी शाळेत शिक्षिका होती, तर तिचा नवरा एका खाजगी कंपनीत कामाला करतो.


शनिवारी (30 नोव्हेंबर) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास फोर्टिस हॉस्पिटलजवळ हा अपघात झाला. हे कुटुंब दुचाकीवरून तांबेनगर येथील नातेवाईकाच्या घरी जात होते. मागून एका ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अमृता आणि तिची मुलगी  रस्त्यावर पडली. पण तिची मुलगी वाचली, मात्र ट्रकच्या मागच्या चाकाने चिरडल्याने अमृताचा मृत्यू झाला.


पोलिसांनी सांगितले की, अमृताला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्या पतीलाही किरकोळ दुखापत झाली आहे. मुलुंड पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 281, 106 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांच्या तपासाला वेग


एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, घटनास्थळाजवळ कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा नाही, परंतु पोलीस इतर ठिकाणचे फुटेज स्कॅन करत आहेत. आरोपी ट्रकचालकाला अटक करण्यासाठी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे.


हे ही वाचा -


Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द, शपथविधीपूर्वी बोलावलेली आमदारांची आजची बैठकही स्थगित


Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला