मुंबई : जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. पदाचा गैरवापर करुन राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी, आता मुंबई उच्च न्यायालयाने लहाने यांना नोटीस बजावली आहे.


मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. लहाने यांना चार आठवड्यात या नोटीसला उत्तर देण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता तात्याराव लहाने यांची अडचण वाढली आहे.

छगन भुजबळ यांनी तब्बल 35 पेक्षा जास्त दिवस यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुक्काम केला होता. तात्याराव लहाने यांच्या मदतीनेच भुजबळ यांनी हा मुक्काम केल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.

तसंच तात्याराव लहाने यांच्यावर काय करावी याबाबत मुंबई उच्च न्यायालय ठरवेल, असा आदेश विशेष ईडी न्यायालयाने दिले होते. त्याआधारे मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. तात्याराव लहाने यांना ही नोटीस बजावली आहे.

भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट, तात्याराव लहाने दोषी