मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं बचावकार्य (Mumbai Ghatkopar Hording) अखेर 63 तासांनी संपल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थाळाची शेवटची पाहाणी करत हे बाचवकार्य संपल्याची घोषणा केली. सोमवारी सायंकाळी मुंबईत जो सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला त्यात, आशियातील सर्वात मोठ होर्डिंग अशी नोंद असलेलं घाटकोपर पूर्व द्रुतगती महामर्गावरील होर्डिंग कोसळलं. आणि कोसळलं ते थेट नजीकच्या पेट्रोल पंपावर. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला तर 75 जण जखमी झाले होते. 


जखमींवर नजीकच्या रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली. या दुर्घटनेचं कारण जाणून घेण्यासाठी पालिकेनं व्हिजेटिआयची मदत मागितली. या घटनेची सारी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्याचं सांगत मुंबई महापालिकेनं आधीच यातून अंग काढून घेतलंय. तर ज्या इगो मीडियाकडे या होर्डिंगचं कंत्राट होतं त्याचा मालक भावेश भिंडेचा मुंबई पोलीसांची सात पथक शोध घेतायत.


मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली होती. होर्डिंग दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर होर्डिंगखाली अडकलेल्या 75 जण जखमी झाले आहेत. 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.  घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अनेकांनी आपली मुलं गमावली. 


होर्डिंग लावलेली जागा रेल्वे पोलिसांची होती. बेकायदा आणि महाकाय होर्डिंग लावायला रेल्वे पोलिसांनीच परवानगी दिली होती. हे बेकायदा काम करणारा महाभाग म्हणजे लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद. सगळे नियम धाब्यावर बसवून या कैसर महाशयांनी इगो मिडीया प्रायव्हेट लिमिटेडला 10 वर्षांच्या काळासाठी होर्डिंग लावायला परवानगी दिली होती. 


 पुणे, नागपूरात महापालिका अलर्ट


मुंबईत घाटकोपरमध्ये झालेल्या घटनेनंतर पुणे, नाशिक आणि नागपूरसारख्या शहरातदेखील अशा घटनांचा मोठा झोका आहे. त्यात अवकाळी आणि वादली पावसाने अनेकदा तिन्ही शहरात मोठ्या आणि किरकोळ घटना घडल्या आहे. या घटना घडू नये, यासाठी तिन्ही शहरात खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात अनधिकृत होर्डिग्सवर थेट कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर नागपुरात दोन विशेष पथक तयार करून शहरातील सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यांची सुरक्षितता तपासली जात आहे. 


इतर महत्वाची बातमी-


बंगळुरूत 'यलो अलर्ट'; संपूर्ण आठवडाभर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईतील परिस्थिती काय?