घाटकोपर ब्रिजवरील वाहतूक पुन्हा सुरु
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2018 09:20 AM (IST)
घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ब्रिज खालच्या बाजूने झुकल्यामुळे त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती

मुंबई : मुंबईतील अंधेरी भागात गोखले ब्रिजचा फुटपाथ पडल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्येही ब्रिज झुकल्याचं समोर आलं होतं. घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ब्रिज खालच्या बाजूने झुकल्यामुळे त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. अखेर पालिका प्रशासनाने हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला. घाटकोपर भागात मध्य रेल्वेवर असलेल्या या पुलाखालून मेल, एक्स्प्रेस आणि लोकल जातात. ब्रिजचा काही भाग खालच्या बाजूने झुकल्यामुळे त्यावर धोक्याच्या खुणा लावल्या होत्या.