Datta Dalvi Arrest : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल अपशब्द वापरणं भोवलं. दत्ता दळवी यांना मुंबई पोलिसांनी आज सकाळी अटक करुन कोर्टात हजर केलं. कोर्टाने दत्ता दळवींना 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.  भा.द.वि कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता दत्ता दळव यांना अटक करण्यात आली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) भांडुप पोलीस स्टेशनला (Bhandup Police) दाखल झाले.  


भांडुप पोलिस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत पोलिस स्टेशनमध्ये पोहचले आहेत. दत्ता दळवींना अटक का केली ? असा जाब पोलिसांना राऊत विचारणार आहेत. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी चर्चा करतील.


Mumbai Mayor Datta Dalvi Arrested : दत्ता दळवींना अटक  


भांडूप मध्ये रविवार (दिनांक 26 नोव्हेंबर) शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.


Mumbai Mayor Datta Dalvi Arrested : नेमकं प्रकरण काय ?


शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला.


शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी (२७ नोव्हेंबर) भांडुपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी  यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी  शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला.  दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली.  यावरून  शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.  त्यांना आजच कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या