Mumbai Fire News: लालबागमधील (Lalbagh News) टोलेजंग इमारत वन अविघ्न पार्कला (One Avighna Park) पुन्हा आग लागील आहे. अग्निशमन दलाला फायर वनचा कॉल देण्यात आला होता. त्यानंतर अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. अद्याप आगीत कोणतीही जीवीतहानी झाल्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 


वन अविघ्न मुंबईतील लालबाग ((Lalbagh Fire News) परिसारातील गगनचुंबी इमारत. ही इमारत एकूण 60 मजल्यांची आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या (Currey Road Railway Station) अगदी बाजूलाच ही इमारत आहे. तसेच या भीषण आगीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 



लेव्हल 1 ची आग असल्याचं कंट्रोल रुमकडून सांगण्यात आलं आहे. सकाळी अकराच्या सुमारास इमारतीच्या 22व्या मजल्यावर आग लागली. आगीत जखमी अथवा मृत झाल्याची कोणतीही माहिती सध्या नाही. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.



अग्नीशमन दलाचे जवान इमारतीत प्रवेश करुन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या इमरातीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अगदी चिंचोळा असल्यामुळं अग्नीशमन दलाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पण आगीपर्यंत पोहोचण्यात अग्नीशमन दलाला जिकरीचं होतं आहे. आगीत आतापर्यंत जीवीतहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.


पाहा व्हिडीओ : लालबागमधील अविघ्न पार्कच्या इमारीला पुन्हा भीषण आग 



तब्बल वर्षभरापूर्वी याच इमारतीला लागलेली आग 


मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला तब्बल वर्षभरापूर्वी आग लागली होती. त्यावेळी लागलेली आग खूपच भीषण होती. त्यावेळी फायर-3 चा कॉल देण्यात आला होता. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते. अनेक नागरिक आगीत अडकले होते. भीषण आगीतून जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. त्यावेळी एका नागरिकानं जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारली होती. इमारतीच्या 19व्या मजल्यावर आग लागली होती. पण काही वेळातच ही आग 5व्या मजल्यापर्यंत पसरली होती.