Mumbai Fire Updates: मुंबईच्या (Mumbai News) दादरमधील (Dadar) कोहिनूर स्क्वेअर इमारतीमध्ये (Kohinoor Square) मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipality) पार्किंगमध्ये (Parking Lot) मध्यरात्री मोठी आग लागली. चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीत 16 ते 17 गाड्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाचे 10 ते 12 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले आहेत. सध्या फायर कूलिंगचं काम सुरु आहे. सुदैवानं या आगीमध्ये कुठल्याही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. कंत्राटदाराकडून नियमांचं उल्लंघन करुन गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यामुळेच ही आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आग कशामुळे लागली याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.


मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात असलेली कोहिनूर स्क्वेअर इमारत तशी वर्दळीच्या ठिकाणी आहे. दादर पश्चिमेत शिवसेना भवन समोरच असलेल्या कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री मोठी आग लागली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कोहिनूर इमारतीमध्ये मुंबई महानगरपालिकेचा पार्किंग लॉट आहे. या पार्किंगमध्ये चौथ्या मजल्यावर ही मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल एक तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं. सध्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये फायर कुलिंगचं काम सुरू आहे. 



सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कोहिनूर इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या 16 ते 17 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. लागलेल्या आगीसंदर्भात स्थानिकांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, कंत्राटदारांकडून नियमांच उल्लंघन करून गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे ही आग लागली. आग कशामुळे लागली या संदर्भात अधिक तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.