Mumbai Fire Accident : दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या परिसरात असलेल्या 24 मजली टॉवर अन्सारी हाईट्सला आग लागल्याची (Fire Accident) घटना घडली आहे. दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. मात्र अचानक लागलेल्या या आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.  


अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर, दोन महिन्यांत होणार कारवाई 


दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातील एका चिंचोळ्या गल्लीत ही इमारत असल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्या एका रांगेत उभ्या आहेत. तर हायड्रॉलिक शिडीच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज दिवसभरात मुंबईत उंच इमारतीला लागलेली ही दुसरी आग आहे. सकाळी पश्चिम उपनगरात अश्याप्रकारे एका उंच इमारतीला आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीला लागलेली आग काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. तर वरच्या मजल्यावरील लोकांना सुरक्षित गच्चीवर ठेवण्यात आलंय. तर अरूंद गल्यामध्ये अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेल्या अनधिकृत बांधकामांवर येत्या दोन महिन्यांत कारवाई करणार असल्याचीही माहिती आता पुढे आली आहे.


अंधेरी पश्चिम सिंचन इमारत आग 


दुसरीकडे अशीच एक आगीचे घटना आज मुंबईचा अंधेरी पश्चिमेत वीरा देसाई रोडवर एका इमारतीमध्ये घडली आहे. वीरा देसाई रोडवर शिनचैन इमारतीचा सहावा मजल्यामध्ये एका घरात सकाळी साडे आठच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळतात अग्निशमन दलाचा चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तब्बल 1 तासामंध्ये आटोक्यात आणण्यात यश आले. त्यानंतर अग्निशमन दलाकडून फायर कूलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र इमारतीच्या 6वा मजल्यावरील 2 घर जळून खाक झाले आहे. आग कशामुळे लागली या संदर्भात अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस आता तपास करत आहेत.


ही एक रहिवासी इमारत आहे. या इमारतीमध्ये मोठा संख्यामध्ये लोक राहतात. आगीच्या माहिती मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जणांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील सामान जळून खाक झाले आहे.


हे ही वाचा