Kirit Somaiya on Uddhav Thackeray Shivsena : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीच्या पदरात मोठं यश टाकलं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान या निवडणुकीत मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) 10 जागा मिळाल्या आहेत. याच मुद्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 36 पैकी उद्धव ठाकरे सेनेला विधानसभेच्या 10 जागा मिळाल्या, या जागांच्या विजयाचं महत्वाचं करण व्होट जिहाद असल्याचे सोमय्या म्हणाले. निवडणुकीत उद्धव ठाकरे सेनेला व्होट जिहाद मौलाना सज्जाद नोमानीमुळे फायदा झाल्याचे सोमय्या म्हणाले.  


ठाकरे सेनेच्या उमेदवाराचा माहीम विधानसभेत 1316 मतांनी विजय झाला. यात कापड बाजार, नया नगर या  मुस्लीम वस्त्याध्ये उद्धव ठाकरे सेनेच्या महेश सावंत यांना 4540 मते तर शिवेसेनेच्या सदा सरवणकर यांना फक्त 459 मते मिळाली असल्याचे सोमय्या म्हणाले. तर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मुस्लिमांनी एकतर्फे उद्धव ठाकरे सेनेला मतदान दिल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली उद्धव ठाकरे सेनेचा विजय म्हणजे व्होट जिहादचा विजय असल्याचे सोमय्या म्हणाले.


हिंमत असेल तर शरद पवार यांनी EVM संदर्भात याचिका करावी


विरोधकांकडून EVM च्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहे. यावर बोलताना किरीट सोमय्यांनी विरोधकांवर टीका केली. हिंमत असेल तर शरद पवार यांनी याचिका करावी. हारले तर EVM घोटाळा, खासदारकीला  जिंकले तेव्हा का नाही म्हणाले EVM घोटाळा असेही सोमय्या म्हणाले. 


मुंबई विभागात विधानसभेच्या एकूण 36 जागा, कोणत्या पक्षाला किती जागा?


मुंबई विभागात विधानसभेच्या एकूण 36 जागा आहे. त्यापैकी काही ठिकाणी शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना (ठाकरे) अशीच लढत आहे. काही ठिकाणी भाजप विरुद्ध ठाकरे सेना लढत झाली. मनसेही निवडणूक मैदानात होती. आता मुंबईत नेमकी कोणाची ताकद सर्वाधिक आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील 36 जागांपैकी 19 जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांचे 15 उमेदवार विजयी झाले. उद्धव ठाकरे यांनी 22 जागा लढवल्या होत्या. त्यात 10 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 14 जागी उमेदवार दिले होते. त्यांना 6 ठिकाणी यश आले.  काँग्रेसला तीन, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक आणि समाजवादी पक्षाला एक जागा मिळाली. राज ठाकरे यांच्या मनसेला एकही जागा मिळाली नाही.


महत्वाच्या बातम्या:


मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून 'व्होट जिहाद'चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा