मुंबई : मुंबईत क्रूझवर चाललेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीच्या छाप्यानंतर ताब्यात घेतलेल्या आठपैकी तीन जणांना एजन्सीने अटक केली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली आहे. एनसीबीने या तीन आरोपींना जेजे रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी नेले आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती एनसीबीच्या सुत्रांनी दिली आहे.
आरोपींना सायंकाळी 7 वाजता न्यायालयात हजर केले जाईल. मुंबईच्या फोर्ट कोर्टात हजर केले जाणार आहे. तीन शक्यता सांगितल्या जात आहे. यात आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले जाऊ शकते. किंवा त्यांना न्यायालयात नेले जाऊ शकते जेथे न्यायाधीश विशेषतः या प्रकरणात सुनावणीसाठी येतील. किंवा मग ते दंडाधिकाऱ्यांच्या बंगल्यावरही नेऊ शकतात.
एनसीबीने शनिवारी रात्री क्रूझवर छापा टाकला आणि तेथून आठ जणांना ताब्यात घेतले. सर्व लोकांची सुमारे 16 तास सखोल चौकशी करण्यात आली आणि त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान, एनसीबीला माहिती मिळाली की त्यांना ज्याने ड्रग्ज दिले तो बेलापूर, नवी मुंबई येथे राहत होता.
Mumbai NCB Raid: मोठं अपडेट! क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आठ जणांना एनसीबीकडून अटक
गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी संध्याकाळी गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला आणि पार्टी करणाऱ्या काही प्रवाशांकडून ड्रग्ज जप्त केली.
एनसीबीने म्हटले आहे, की "ऑपरेशन दरम्यान, संशयितांचा शोध घेण्यात आला आणि त्यांच्याकडून वेगवेगळे अंमली द्रव्य जप्त करण्यात आले, जे त्यांनी त्यांच्या कपड्यांमध्ये, अंडरवेअरमध्ये आणि (महिला) पर्समध्ये लपवले होते. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ताब्यात घेतलेल्यांना आता न्यायालयात हजर केले जाईल. जे त्यांनी त्यांचे कपडे, अंतरवस्त्रे आणि (महिलांनी) पर्समध्ये लपवले होते. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ताब्यात घेतलेल्यांना आता न्यायालयात हजर केले जाईल.