Cruise Drugs Party: मुंबईत क्रूझ जहाजावर  ड्रग्ज पार्टी सुरु असताना रविवारी रात्री उशिरा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा मारला. यात एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलासह आठ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. एनसीबीकडून सांगण्यात आलंय की तपासाच्या आधारे आणखी छापे मारले जाऊ शकतात. दरम्यान, क्रूज ड्रग्ज पार्टीबाबत बॉलिवूडमधून पहिली प्रतिक्रिया आली आहे. चित्रपट अभिनेता सुनील शेट्टी यांनी सोमवारी सांगितले की, जिथे छापा मारला जातो तिथं बरेच लोक पकडले जातात. ते म्हणाले की आपण अंदाज बांधतो की या मुलाने ड्रग्ज घेतलं, त्या मुलाने ड्रग्ज घेतलं.


NCB Raid : कारवाईनंतर 'त्या' अभिनेत्याच्या मुलगा म्हणाला, 'मला व्हिआयपी गेस्ट म्हणून बोलवलेलं' तर अधिकारी म्हणतात...


सुनील शेट्टी म्हणाले.. आता तपास सुरू आहे
शेट्टी पुढे म्हणाले, की "मला वाटते की या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे. मुलाला आता श्वास घेण्याची संधी द्या. जेव्हाही आमच्या चित्रपट इंडस्ट्रीत काही घडते तेव्हा मीडिया तुटन पडतो. प्रत्येकाला वाटतं की हे असच असेल. मुलाला रिपोर्ट करण्याची एक संधी द्या, जेणेकरून सत्य बाहेर येईल. जोपर्यंत तो लहान आहे, त्याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे."


Mumbai NCB Raid: मोठं अपडेट! क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आठ जणांना एनसीबीकडून अटक


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईतील क्रूझवर छापा टाकल्यानंतर त्यांच्याकडून अंमली पदार्थ जप्त केले आहेत. एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान म्हणाले की, मुंबईतील क्रूजवरील पार्टी आणि तिथून जप्त करण्यात आलेली ड्रग्ज यांच्या संदर्भात चौकशीसाठी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. माहितीच्या आधारे पुढील छापे टाकले जातील.


NCB Raid LIVE UPDATES : क्रूझवर NCBची मोठी कारवाई, बड्या अभिनेत्याचा मुलगा सहभागी, पाहा घटनेचे प्रत्येक अपडेट्स


आता आणखी छापे टाकले जातील : NCB प्रमुख
एस.एन प्रधान म्हणाले की, आम्ही माहिती गोळा करत आहोत, पार्टीसाठी चरस आणि एमडीएम सारखे ड्रग्ज कुठून आणली होती तेथून कारवाई करत आहोत. एनसीबी प्रमुख म्हणाले की आम्ही निष्पक्ष पद्धतीने काम करत आहोत, या प्रक्रियेत काही बॉलिवूड कनेक्शन किंवा काही श्रीमंत लोक असू शकतात. आपल्याला कायद्याच्या कक्षेत राहून आपले काम करावे लागेल.


ते पुढे म्हणाले की त्यांना मुंबईत त्यांचे काम सुरू ठेवावे लागेल. जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर केवळ गेल्या एका वर्षात 300 पेक्षा जास्त छापे टाकण्यात आले आहेत. हे आणखी पुढे चालू राहील, मग त्यात परदेशी नागरिक, चित्रपट उद्योगातील लोक किंवा श्रीमंत लोक असतील.