Mumbai Crime : एका वृद्ध जोडप्याच्या घरातून 55 लाख रुपयांचे दागिने, महागडे कपडे आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याप्रकरणी दोन बहिणींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 55 लाख रुपयांचे दागिने आणि महागडे कपडे चोरून या बहिणींनी इन्स्टा रील केली आहेत. या रीलवरून त्यांची रवानगी आता पोलिस कोठडीत झाली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.


चोरीचे दागिने आणि कपडे घालून 'रील्स'


छाया वेतकोली (24) आणि भारती वेतकोली (21) अशी अटक करण्यात आलेल्या बहिणींची नावे आहेत. छाया आणि भारतीने चोरीचे दागिने आणि कपडे घालून 'रील्स' करत इन्स्टाग्रामवर अपलोड केले, असे काळाचौकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. दुसरीकडे, घरातून दागिने, कपडे आणि रोख रकमेसह विदेशी चलन गहाळ झाल्याची तक्रार या दाम्पत्याने नुकतीच दिली होती.


55 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त


तपासादरम्यान पोलिसांना दाम्पत्याच्या दोन घरगुती मदतनीस अनेकदा दागिने आणि महागडे कपडे दाखवणारे रील अपलोड करत असल्याचे समोर आले. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींना दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातून पकडण्यात आले होते आणि त्यांच्या ताब्यातून 55 लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आली होती. ते म्हणाले की, दोघींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 381 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


मुंबईत अभियंत्यासोबत फसवणुकीचे प्रकरण


दुसरीकडे, ठाण्यातूनही फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा नफा कमावण्याच्या बहाण्याने एका अभियंत्याची 3.7 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाण्यात पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली.


एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या वाशी येथील रहिवासी असलेल्या 43 वर्षीय अभियंत्याने 17 फेब्रुवारी 2024 रोजी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची लिंक पाहिली होती. नवी मुंबई सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी सांगितले की, अभियंत्याने लिंकवर क्लिक केले आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमावल्याची माहिती मिळाली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या