मुंबई : मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या गुंड प्रसाद पुजारी (Prasad Pujari) चीनमध्ये लग्न करुन संसार थाटला होता. मात्र अखेर मुंबई क्राईम ब्रांचच्या तावडीत तो सापडला. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2020 च्या खंडणी प्रकरणात चीनमधून भारतात आणलेल्या गुंड प्रसाद पुजारीला चौकशीसाठी कस्टडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2020 मध्ये प्रसाद पुजारी याने विक्रोळी येथे राहणाऱ्या एका बिल्डरकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी  मुंबई गुन्हे शाखेने पुजारीची कस्टडी घेत, त्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 8 मेपर्यंत पुजारीची कस्टडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिली आहे.


अटकेपुर्वी प्रसाद पुजारी चीनमध्ये लपून बसला होता. चीनमध्ये त्याने एका महिलेशी लग्नही केले होते. या महिलेपासून त्याल एक मूल देखील आहे ज्याचे वय सुमारे 4 वर्षे आहे. मुंबई क्राईम ब्रँचने 2020 मध्ये पुजाऱ्याच्या आईला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना पुजारीच्या व्हिसाची मुदत संपल्याची माहिती मिळाली. मार्च 2008 मध्ये प्रसाद पुजारीला चीनमध्ये तात्पुरते वास्तव्य मिळाले होते, त्याची मुदत मार्च 2012 मध्ये संपली होती. पुजारी मे 2008 मध्ये संपलेल्या व्हिजिट व्हिसावर तेथे गेला होता. पुजारी  चीनमध्ये लुओहूतील, शेनझेन शहर ग्वांगडोंग प्रांतात लपून होता.पोलिस कस्टडीत पुजारी आता काय माहिती देतो हे पाहणं महत्वाचे आहे. 


मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे सुमारे 15 ते 20 गुन्हे


गँगस्टर प्रसाद पुजारीवर मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे सुमारे 15 ते 20 गुन्हे, एक खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे दाखल आहेत. मुंबईत खंडणी रॅकेट चालवल्याबद्दल गुन्हे शाखेनं त्याची आई इंदिरा यांना अटक केली होती. 2020 पर्यंत प्रसाद पुजारी मुंबईत खूपच सक्रिय होता. 2020 मध्ये, विक्रोळीतील तगरे नगर येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याप्रकरणी खंडणी विरोधी सेलने सागर जाधव आणि इतर पाच जणांना अटक केली होती. या गोळीबार प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांना प्रसाद पुजारीची आई इंदिरा यांचाही यामध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाली होती.  


इतर महत्वाची बातमी-


Raj Thackeray: सत्तेसाठी या थराला जाऊन स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही; धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याच्या ऑफरला राज ठाकरेंचं उत्तर


Rahul Gandhi on Electoral Bonds : राजकारण साफ करत होता, तर निवडणूक रोख्यातील देणगीदारांची नावं का लपवली? राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल 


Mahadev Jankar : अजित पवारांनी माझा प्रचार केला, बारामतीत प्रचार करणं माझं कर्तव्य - महादेव जानकर