Mumbai Crime : मुंबईतील लालबागमध्ये (Lalbaug) आपल्याच आईची हत्या करणाऱ्या मुलीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात करण्यात आले. यावेळी मुलीने न्यायालयात आणखी धक्कादायक माहिती दिली आहे. मी आईची हत्या केली नाही, फक्त तिचे तुकडे केले अशी कबुली रिंकलने न्यायालयात दिली आहे. आईला मारून तिचे तुकडे का केले? असे न्यायाधीशांनी विचारल्यानंतर रिंकलने न्यायालयात उत्तर दिले. याप्रकरणी आरोपी मुलगी रिंकलला कोर्टाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रिंकलने आपल्या जबाबत सांगितलं की, 27 डिसेंबर 2022 रोजी तिची आई पहिल्या मजल्यावरून खाली पडली. हॉटेलच्या दोन मुलांनी तिला उचलून घरी आणले. त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला होता. तिने कोर्टात हे सांगितलं की, आईच्या मृत्यूचा आरोप माझ्यावर येईल आणि माझे घर जाईल तसेच आईचे मामाकडे असलेले बँकेतील पैसे मिळणार नाही, या भीतीने तुकडे केले.
14 मार्चला तारखेला मुंबईतील लालबाग परिसरात इब्राहिम कासम इमारतीत राहणाऱ्या 23 वर्षीय रिंकल या मुलीने तिची आई वीणा प्रकाश जैन 55 वर्षीय महिलेची हत्या केली. काळाचौकी पोलिसांनी यासंदर्भात भादवी कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आणि रिंकलला अटक केलं. पोलिसांनी घरातून इलेक्ट्रॉनिक मार्बल कटर, कोयता आणि चाकू जप्त केले. आरोपी मुलीने या धारदार शस्त्रांच्या साहाय्याने महिलेच्या शरीराचे पाच तुकडे करून ते प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून घराच्या कपाटात आणि लोखंडी पाण्याच्या टाकीत ठेवले.
क्राईम टीव्ही शो पाहून केला गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकल क्राईम टीव्ही शो पाहत होती ज्यामुळे तिला गुन्हा करण्यात मदत झाली. पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला असून तिने गुगलवर काय सर्च केले याचा तपास करत आहे. डेथ बॉडीचे विघटन कसे करायचे हे देखील रिंकलने गुगलवर शोधले. मृतदेहातून दुर्गंधी येत असल्याने अनेक शेजारी आणि इतरही तक्रार करत होते. परिसरातील एका मेडिकल शॉपमधून सुमारे 100 परफ्यूम आणि एअर फ्रेशनर खरेदी केले होते. ज्याचा वापर तिने दुर्गंधी कमी करण्यासाठी केला होता, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
प्रियकर श्रीनिवास मुळीकची देखील पोलीस चौकशी
आई पडल्यानंतर हॉटेलच्या ज्या दोन मुलांनी तिला घरापर्यंत आणले त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता आई जिवंत असल्याची माहिती दोघांनी दिली. सँडविच विक्री करणाऱ्या अमजद अली उर्फ बॉबीला याची चौकशी केली असता त्याने आईची नस पाहून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच रिंकलला नातेवाईकांना देखील कळवण्यास सांगितले. चायनीज हॉटेलचा मॅनेजर असलेल्या प्रियकर श्रीनिवास मुळीकची देखील पोलीस चौकशी करत आहे.