Decline in Car And Bike Purchases : दरवर्षी गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2023) मुहूर्त साधत बाईक (Bike) आणि कारची (Car) खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र मुंबईमध्ये (Mumbai) यंदाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार खरेदी जवळपास 50 टक्यांनी कमी झाली आहे, तर बाईकची खरेदी 28 टक्क्यांनी कमी झाली आहे. मुंबईत मेट्रोचे वाढतं जाळं शिवाय सार्वजनिक वाहतुकीचे वाढते पर्याय यामुळे नवी कार, नवी बाईक खरेदी करण्याचे प्रमाण कमी झालं असल्याचं तज्ञांकडून सांगितलं जात आहे.


गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाचे मुहूर्त साधत अनेक जण नवी कार किंवा एखादी नवी बाईक गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करुन घरी आणता यावी यासाठी आधीच बुकिंग करुन ठेवतात. मात्र मुंबईमध्ये नव्या कारची बुकिंग मागील वर्षीच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्ताची तुलना केली तर 50 टक्क्यांनी कमी झाले आहे तर बाईकची बुकिंग सुद्धा 28 टक्क्यांनी कमी झाले आहे. मुंबईकर बाईक किंवा कारने प्रवास करण्यापेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय अधिक अवलंबताना पाहायला मिळत आहेत. 


मुंबईकरांना सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध 


मुंबईमध्ये मेट्रो 1, मेट्रो 2A, मेट्रो 7 त्याशिवाय येऊ घातलेली मेट्रो लाईन 3 या वाढत चाललेल्या मेट्रोच्या जाळ्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर आणि जलद गतीने होत आहे. त्याशिवाय वाहतूक कोंडीतून या सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायामुळे मोठ्या प्रमाणावर सुटका होत आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग त्यासोबतच पूर्व द्रुतगती मार्ग या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मेट्रोच्या पसरणाऱ्या जाळ्यामुळे प्रवास सुलभ आणि जलदगतीने होण्यास चांगला पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे याच कारणामुळे मुंबईकर नव्या कार किंवा नव्या बाईकने प्रवास करण्यापेक्षा सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय अवलंबून प्रवास करणे पसंत करताना दिसत असल्याचं तज्ञांचे म्हणणे आहे


वाढीव किंमतीमुळे बाईक-कार खरेदी कमी?


वाढलेल्या किमती हे सुद्धा बाईक आणि कार खरेदी कमी होण्यामागचं कारण आहे. मुंबईमध्ये मागील वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील आरटीओ कार्यालयांमध्ये 2230 नव्या कारचे रजिस्ट्रेशन झाले होते तर यंदाच्या वर्षी फक्त 1130 कारचे रजिस्ट्रेशन झाले. तर नव्या बाईक खरेदीमध्ये मागील वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 4292 नव्या बाईकचे रजिस्ट्रेशन झाले होते तर या वर्षी 3110 नव्या बाईक रजिस्ट्रेशन आरटीओ कार्यालयांमध्ये झाले आहे


भविष्यात कार आणि बाईकचे बुकिंग वाढणार?


मोठ्या प्रमाणावर जलद गतीने पसरणार मुंबईतील मेट्रोचे जाळं, त्यासोबतच सुरु झालेल्या एसी बेस्ट बस सेवा त्यासोबतच एसी लोकल सेवा यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा खाजगी वाहनांपेक्षा सुकर त्यासोबतच कमी वेळात होत आहे. त्यामुळे अनेक जण सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय अवलंबताना पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुद्धा अधिक प्रयत्न करण्याची या गरज आहे. मात्र भविष्यात होणारा कोस्टल रोड आणि इतर इन्फ्रा प्रोजेक्ट पाहता हे चित्र असंच राहणार? की भविष्यात नव्या कार आणि नव्या बाईकचे बुकिंग वाढणार? हे सध्याच्या स्थितीत सांगण तसं अवघड आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI