Mumbai Crime News : मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्ष (Mumbai Crime Branch), वांद्रे युनिटने एका 41 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांना त्याच्याकडे 10.25 लाख रुपये किमतीचा 41 किलो गांजा सापडला आहे.


पोलिसांना संशयास्पद असल्याचे आढळले


वांद्रे युनिटचे पथक एन्टोप हिल परिसरात गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयास्पद असल्याचे आढळून आले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे पोलिसांना गांजाने भरलेली गोणी सापडली. या पथकाने त्याच्या राहत्या घरी छापा टाकून एकूण 41 किलो गांजा सापडला. तपासादरम्यान आरोपी इतर राज्यातून गांजा आणतो, तसेच हा व्यक्ती गांजा पुरवठादार असून मुंबई आणि उपनगरात ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचं पोलिसांना आढळून आले. 


गुन्हा दाखल
पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सलमान झाकीर हुसेन शेख (41) असून तो मुंबईचा रहिवासी आहे. दरम्यान, पोलिसांकडून अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Rain Updates : राज्यात अतिवृष्टीचा इशारा; अनेक ठिकाणी शाळा बंद, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द


Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी 'रेड अलर्ट' जारी


Mumbai Rains : मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द, नवीन तारखा लवकरच जाहीर करणार 


Dombivali News : वाहतूक पोलीस हवालदाराला चारचाकीने नेले फरफटत, डोंबिवलीतील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद