मंजुळा कारागृहात चक्कर येऊन कोसळली, पोलिसांचा कोर्टात दावा
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 24 Jul 2017 01:30 PM (IST)
मंजुळा शेट्ये चक्कर येऊन कारागृहात कोसळली, त्यामुळे तिच्या शरीरावर खुणा असल्याचा अजब दावा मुंबई पोलिसांनी हायकोर्टात केला आहे.

मुंबई : मंजुळा शेट्ये चक्कर येऊन कारागृहात कोसळली, त्यामुळे तिच्या शरीरावर खुणा असल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केल्यावर हायकोर्टाने पोलिसांना झापलं आहे. भायखळा जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्येच्या मृत्यू प्रकरणी प्रदीप भालेकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीच्या वेळी 'बाथरुममध्ये घसरुन पडल्यामुळे मंजुळाच्या अंगावर खुणा होत्या' असा अजब दावा पोलिसांनी हायकोर्टात केला. यावर 'इतर प्रकरणातही दोषींना वाचवण्यासाठी अशीच मदत करता का?' असा थेट सवाल हायकोर्टाने क्राईम ब्रांचला विचारला. काय आहे नेमकं प्रकरण? भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.