मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. कर्जमाफीसाठी सरकारनं आधीच यादी जाहीर केली असताना अर्ज भरुन घेण्याची गरज काय? असा सवाल विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
अधिवेशनाच्या आदल्या दिवशी परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षाला चहापानासाठी निमंत्रित केलं होतं.
मात्र विरोधीपक्षांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन चहापानावर बहिष्कार टाकला.
इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाने वेगवेगळी बैठक घेतली. 'दोन्ही विरोधी पक्षांनी दिलेले पत्र सारखेच आहे. कुठलाही नवीन मुद्दा विरोधकांनी मांडला नाही. विरोधकच आपापसात भांडत आहेत', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
14 विधेयक प्रस्तावित असून परिषदेत 7 प्रलंबित विधेयकं आहेत. एकूण 21 विधेयक या अधिवेशनात असतील, अशी माहितीही फडणवीसांनी दिली.
ज्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आलं आहे, अशा यादीत आपण नसल्याचं डिक्लेरेशन करावं लागेल, जेणेकरुन घोस्ट अकाऊंट टाळता येतील, घोटाळे टाळता येतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2017 10:41 AM (IST)
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. कर्जमाफीसाठी सरकारनं आधीच यादी जाहीर केली असताना अर्ज भरुन घेण्याची गरज काय? असा सवाल विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -