Mumbai: मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) युनिट 11 ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह 7 जणांना अटक केलीय. दहिसर चेकनाक्याजवळ वाहनात बसून येणाऱ्या काही लोकांकडं कोट्यावधी रुपयांच्या बनावट नोटा असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असं गुन्हे शाखेच्या युनिट 11 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी सांगितलंय.


विनायक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकानं दहिसर चेकपोस्टवर जाऊन सापळा रचला. तसेच संशयित कारला थांबवून त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडं कोट्यींची रोकड सापडली. त्यांच्याकडून दोन हजारांच्या एकूण 25 हजार नोट जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आलीय. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडं चौकशी केली असता, त्यांचे इतर साथीदार अंधेरी परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. तसेच त्यांच्याकडंही बनावट नोटा असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर गुन्हे शाखेनं तत्काळ एक पथक तयार करून संबंधित हॉटेलमध्ये गेली आणि छापा टाकला. या छाप्यात गुन्हे शाखेनं 2000 हजाराच्या एकूण 10000 नोटा जप्त केल्या, ज्या एकूण 2 कोटी होत्या.


या कारवाई मुंबई गुन्हे शाखेनं एकूण सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 7 आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आलीय.


हे देखील वााचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha