Mumbai Corona vaccination Update: जगभरात कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे पुन्हा कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण केलेल्या म्हणजेच दोन डोस घेतलेल्या नागरिकांपैकी फक्त जवळपास 15% नागरिकांनी बूस्टर डोस घेतल्याचं मुंबई महापालिकेच्या आकडेवारी समोर आले आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यात दिलेल्या टार्गेटप्रमाणे दोन्ही डोस 100 टक्के देण्यात आले.त्यानंतर मात्र नागरिकांनी बूस्टर डोस कडे पाठ फिरवली आहे. सद्यस्थितीत मुंबईमध्ये 40 लसीकरण केंद्र सुरू आहेत, यामध्ये दर दिवशी 100 पेक्षा कमी नागरिक लसीकरणासाठी येत असल्याची परिस्थिती आहे.


यामध्ये पालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिन या लसीचे डोस आहेत. कोव्हिशील्ड आणि कोर्बोवॅक्स या लसीचा साठाच नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. यामुळे लसीकरणाचा बाबत पालिकेच्या आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी आणि नियोजन केले जात असताना पुन्हा एकदा लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा जनजागृतीची गरज भासणार आहे.  शिवाय बूस्टर डोसची मात्र अधिकाधिक नागरिकांना द्यावी लागणार आहे


लसीकरणाची आकडेवारी काय सांगते ?


देशभरात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. 


मुंबईत 2011 च्या जनसंख्येच्या नोंदी प्रमाणे 1 कोटी 30 लाख नागरिक आहेत. त्यामधील 94 लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट सरकाराने पालिकेला दिले होते.


 पालिकेने 1 कोटी 8 लाख 89 हजार 721 नागरिकांना लसीचा पहिला, 98 लाख 8 हजार 748 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. 


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबईमध्ये केवळ 14 लाख 48 हजार 785 नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे 


त्यामुळे अद्यापही 83 लाख 59 हजार 963 नागरिक बूस्टर डोसपासून लसीपासून वंचित आहेत.  


मुंबईत लसीकरणाची काय स्थिती आहे?


मुंबईमध्ये कोव्हीशील्ड, कोवॅक्सिन आणि कोर्बोवॅक्स या लस देण्यात आल्या. 


मुंबईमध्ये सध्या कोवॅक्सिन या लसीचे केवळ 6 हजार डोस बाकी आहेत. नागरिक लसीकरणासाठी कमी येत असल्याने लशींची मात्रा वाया जाऊ नये त्या दृष्टिकोनातून साठा सुद्धा कमी ठेवण्यात आला आहे


सरकारी लसीकरण केंद्रात कोव्हीशील्ड आणि कोर्बोवॅक्स या लसीचा एकही डोस शिल्लक नाही. या डोस साठी नागरिकांना खाजगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस घेण्यासाठी जावे लागेल


मुंबईत सध्या 40 ठिकाणी लसीकरण सुरु आहे. त्यातील 36 पालिकेची आणि 4 राज्य सरकारची केंद्र आहेत.


ही बातमी देखील वाचा


Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोविड परिस्थिती नियंत्रणात; नव्या प्रकाराचा रुग्ण नाही, सरकार सतर्क