Mumbai Corona Update : मुंबईत आढळणाऱ्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. बुधवारी तब्बल 1765 कोरोना रुग्ण आढळले. तसेच रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा दरही एका दिवसात हजारच्या खाली गेला असून 866 दिवसांवर गेला आहे. ही आकडेवारी मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय आहे.
मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 1765 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी 83 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. बुधवारी 739 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 866 झाला आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 739 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 7000 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,46,972 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 986 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.079% टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 7000 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 1482 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 650 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 13, रायगड 253, पालघर 181, रत्नागिरी 17, सिंधुदुर्ग 10, नागपूर 58, चंद्रपूर 11, वाशिम 13, औरंगाबाद 11 आणि नाशिकमध्ये 35 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 2701 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला 800 - 900 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे. तर आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. बुधवारी राज्याच तब्बल 2 हजार 701 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत 1765 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
संबंधित बातम्या