Coronavirus Cases Today : भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील कोरोनाच्या संसर्गात वाढ कायम आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात पाच हजार 233 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ही मागील तीन महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. मार्चनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या 28 हजार 857 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.






महाराष्ट्रात मुंबईत सर्वाधिक रुग्ण
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. महाराष्ट्रात 1881 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सर्वात जास्त 1242 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत 450 नवीन रुग्ण आढळले आहेत. मध्य प्रदेशात 236, तामिळनाडू 114, गोव्यात 62, छत्तीसगडमध्ये 10 कोरोनाबाधित आढळले आहेत.


मंगळवारी दिवसभरात 3 हजार 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात एकुण 4 कोटी 26 लाख 36 हजार 710 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्णांचा सकारात्मक दर 98.72 टक्के आहे. तर दैनंदिन रुग्ण सकारात्मकता दर 1.67 टक्क्यांवर पोहोचला आहे. मंगळवारी झालेल्या सात मृत्यूंसह देशातील कोरोनाबळींचा आकडा पाच लाखांच्या पुढे गेला आहे. भारतात एकुण 5 लाख 24 हजार 715 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या



बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.