Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 1242 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी 74 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी 506 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 5974 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,46,233 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 986 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.070% टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 5974 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 562 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1310 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 12, रायगड 228, पालघर 148, रत्नागिरी 17, नागपूर 53, चंद्रपूर 13 आणि नाशिकमध्ये 36 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 1881 रुग्णांची नोंद
राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला 200 - 500 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे. तर आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. मंगळवारी राज्याच तब्बल 1 हजार 881 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत 1242 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
संबंधित बातम्या