Salman Khan Death Threat : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले असून त्या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत. मुंबई पोलिसांनी आता सलमान, सलीम खान आणि बॉडी गार्डसह त्यांच्या संपर्कातील काही लोकांचा जबाब नोंदवला आहे. 


काय म्हणाला सलमान आपल्या जबाबात?


येत्या काही दिवसांत सलमानचे कोणासोबत भांडण झाले होते का?


सलमान म्हणाला, नाही. येत्या काही दिवसांत माझे कोणासोबतच भांडण झालेले नाही. ना मला कोणताही वादग्रस्त मेसेज आला आहे. 


धमकीचे पत्राबाबत कोणावर संशय आहे का?


जबाब नोंदवत सलमान म्हणाला, धमकीचे पत्र मला मिळालेले नसून माझ्या वडिलांना सलीम खान यांना मिळालेले आहे.  सकाळी जॉगिंगसाठी ते गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना हे पत्र मिळालं. माझा कोणावरच संशय नाही. 


गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा यामागे हात असेल असं वाटतं का?


लॉरेन्स बिश्नोईला मी गेल्या काही वर्षांपासून ओळखत आहे. पण मी त्याच्या जास्त संपर्कात आलेलो नाही. 


सलमान खान प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू


सलमान खान प्रकरणाचा मुंबई पोलिस गांभीर्याने तपास करत आहेत. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे पुढे म्हणाले,"सलमान खान प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून आवश्यक ती पावले उचचली जात आहेत. पत्र खोटे आहे की खरे या निष्कर्षावर आताच पोहोचू शकत नाही". 


नेमकं प्रकरण काय?


सलमान खानचे वडील सलीम खान हे रविवारी सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता, त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले होते. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी आता सलमान खांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.


संबंधित बातम्या


Salman Khan : सलमान खान प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू : संजय पांडे


Salman Khan : 'सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागे हात नाही'; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा दावा


बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.