Mumbai Corona Cases Update: राजधानी दिल्लीसह राज्यभरत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आजपासून वृद्धांना कोविड-19 ची नाकावाटे लस देण्यात येणार आहे. मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर इन्कोव्हॅक (iNCOVACC)  ही नाकावाटे लस दिली जाणार आहे. लसीचे मोफत डोस केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच उपलब्ध असतील अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.


मुंबई महनगरपालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे. मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर  भारत बायोटेकची   इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154)  नाकावाटे दिली जाणारी लस उपलब्ध  असणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे या केंद्रांची यादी जारी करण्यात आली आहे.  24 वॉर्डांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असेल. नोंदणी  जागेवरच होईल आणि लसीकरण केंद्रे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहतील.   इन्कोव्हॅक ही नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे. इंग्रजीमध्ये या लशीला Intra-Nasal Covid Vaccine असं म्हटलं जाते.


केंद्रांची यादी पुढीलप्रमाणे: 






 


कुठे घेता येणार लस?


ही लस 60 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना घेण्यात येणार आहे. कोरोनाचे दोन डोस झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी घेता येणार आहे. दुसऱ्या डोसला सहा महिने पूर्ण झाल्यनंतरच ही लस घेता येणार आहे. कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सीन या पैकी कोणत्याही लसीचे दोन डोस पूर्ण झाले असतील तर  लस घेता येणार आहे. या लसीसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ही लस केंद्रावरच मिळणार आहे. 


राज्यात या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 15 टक्के घट


राज्यात मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 15 टक्के घट झाली आहे.  सध्या राज्यात 5 हजार 233  रुग्ण कोरोनाबाधित आहेत.  20 ते 26 एप्रिल दरम्यान राज्यात 5 हजार 233 कोरोना रुग्ण आढळले होते. 13 ते 19 एप्रिल दरम्यान ही संख्या 6 हजार 102 तर 6 ते 12 एप्रिल दरम्यान 5 हजार 421  नव्या रुग्णांची नोंद झाली होती.