Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत 676 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी 54 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सोमवारी 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 5238 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,45,727 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 1051 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.066% टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 5238 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 534 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1172 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 10, रायगड 200, पालघर 112, रत्नागिरी 16, नागपूर 32, चंद्रपूर 15 आणि सिंधुदुर्गमध्ये 10 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आज 1036 रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्या रोज हजाराचा टप्पा ओलांडत आहे. आज राज्यात 1036 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 374 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 676 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
संबंधित बातम्या