Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत 375 नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी सतरा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. रविवारी 234 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 234 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 2070 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,43,342 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 2872 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.024% टक्के इतका आहे.






सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2070 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 333 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 354 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 18, रायगड 87, पालघर 34 आणि नागपूरमध्ये 18 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 2997 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात कोरोनाच्या संख्येत (Maharashtra Corona Update) दिवसेंदवस वाढ होताना दिसत आहे. गेली तीन दिवस राज्यात नव्याने आढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या देखील पाचशेपार आहे. रविवारी राज्यात 550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 324 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 828 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार देशात नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येतही भर पडली आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 550 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 324 रुग्ण कोरोनामुक्त


Coronavirus : देशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, सक्रिय रुग्णांमध्येही वाढ रुग्ण, 14 जणांचा मृत्यू