Coronavirus Cases Today in India : भारतात कोरोनाचा धोका पुन्हा वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 828 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार देशात नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येतही भर पडली आहे. आधीच्या दिवशी 2658 नवी कोरोनाबाधित रुग्ण आणि 33 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या 24 तासांत झालेल्या 14 रुग्णांच्या मृत्यूंसह देशातील कोरोना बळींची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 586 रुग्णांचा मृत्यू झालाा आहे. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही 17 हजारांवर पोहोचली आहे.


सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली


आरोग्य मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 17 हजार 87 रुग्णांवर पोहोचली आहे. आदल्या दिवशी हा आकडा 16 हजारांवर होता. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 035 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 26 लाख 11 हजार 370 वर पोहोचली आहे. सध्या देशात 17 हजार 87 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. देशातील दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर 0.60 टक्क्यांवर पोहोचला आहे.


महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवे व्हेरियंट


महाराष्ट्रात नवीन ओमायक्रॉन या कोरोनाच्या उपप्रकारांचे नवे व्हेरियंट आढळले आहेत. पहिल्यांदा बी ए. 4 व्हेरियंटचे चार आणि बी. ए 5 व्हेरियंटचे तीन रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात बी ए. 4 व्हेरियंटचे  चार आणि बी. ए 5 व्हेरियंटचे तीन रूग्ण आढळले आहेत. राज्यात आढळलेले बी ए. व्हेरियंटचे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहे. यामध्ये चार पुरूषांचा आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असून यातील 9 वर्षाच्या लहान मुलाने लस घेतलेली नाही.  सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून सर्व रुग्णांना घरगुती विलिगीकरणात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या