मुंबई : गेल्या काही दिवसांचा विचार करता मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 330 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 5 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 378 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. 


मुंबईत सध्या 3386 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,34,590 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1642 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.04 टक्के इतका झाला आहे. 


 




Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 1193 रुग्णांची नोंद तर 39 जणांचा मृत्यू


दिवाळीत तीन दिवस लसीकरण बंद
गुरुवार दिनांक 4 नोव्हेंबर ते रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 असे चार दिवस मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर कोविड लसीकरण बंद राहणार आहे. त्यानंतर सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी लसीकरण पूर्ववत सुरु करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येतेय. 


Mumbai Vaccination : मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर गुरुवार ते रविवार लसीकरण बंद राहणार


मुंबईतील 10 हजार सोसायट्या 'फुल्ली वॅक्सिनेटेड' 
मुंबईतील 10 हजार सोसायट्या लसवंत (Fully Vaccinated) झाल्या असून 10 हजार इमारतीतील रहिवाशांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. या इमारतींवर महापालिकेकडून विशेष लोगो लावला जातोय. मुंबईतील 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा लोगो लावण्यात येणार आहे.  येत्या जानेवारीपर्यंत संपूर्ण मुंबई लसवंत होणार असल्याचा सत्ताधारी शिवसेनेचा दावा आहे. अशातच मुंबईत एकूण 37 हजार इमारती आहेत. त्यापैकी 22 हजार इमारतींच्या सोसायट्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 10 हजार इमारती संपूर्ण लसवंत झाल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या (BMC) वतीनं देण्यात आली आहे. 


Pune Coronavirus Vaccination : दिवाळीत पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद!