मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली होती. पण राज्यातील कोरोनास्थिती आता नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्येत अंशत: वाढ झाल्याचं दिसून आलंय. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 1193 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात राज्यामध्ये 1,599 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट हा 97.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Pune Coronavirus Vaccination : दिवाळीत पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद!
राज्यात सध्या 15 हजार 119 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,87,286 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 895 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,,29,47,355 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
पुणे जिल्ह्यात सध्या सर्वाधिक म्हणजे 3204 सक्रिय रुग्णसंख्या आहे. जळगाव (8), नंदूरबार (1), धुळे (1), जालना (25), बीड (58), लातूर(35), परभणी (37), हिंगोली (20), नांदेड (24), अकोला (19), अमरावती (17), वाशिम (02), अकोला (19), बुलढाणा (07), नागपूर (36), यवतमाळ (05), वर्धा (7), भंडारा (2), गोंदिया (2), चंद्रपूर (17) गडचिरोली (3) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
Mumbai Vaccination : मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर गुरुवार ते रविवार लसीकरण बंद राहणार
देशात कोरोनाच्या 11 हजार 903 रुग्णांची नोंद
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Covid-19) चा प्रादुर्भाव अद्याप सुरुच आहे. देशात दैनंदिन रुग्णांचा आकडा कमी झालेला असला तरी गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11 हजार 903 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच काल 311 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यात वाढ झाली असून देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 4 लाख 59 हजार 191 वर पोहोचला आहे