Mumbai Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मुंबईतही दैनंदिन कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग कमी झाला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या 500 च्या खाली आली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 349 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही. तसेच मुंबईचा रिकव्हरी रेटही 98 टक्केंवर पोहचला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याची चिन्हे आहेत. 

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 349 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 635 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 10,31,304 इतकी झाली आहे. मुंबईतील अॅक्टिव रुग्णांची संख्या 2925 इतकी झाली आहे. मुंबईकरांना आणखी दिलासा मिळाला आहे, कारण कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा आज एक हजारांपार गेला आहे. मुंबईचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 1273 दिवस झाला आहे. मुंबईत सद्या एकही इमारत किंवा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) नसल्याने पालिकेसह मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.06% टक्के इतका झाला आहे.  मुंबईत मागील 24 तासांत 3 रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. आज नव्याने सापडलेल्या 349 रुग्णांपैकी 43 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

महत्वाच्या बातम्या :