Mumbai Cold Weather News : राज्यातील तापमानात (Temperature) सातत्यानं बदल होत आहे. रात्री कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. हळूहळू राज्यात थंडीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतही (Mumbai) तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत किमान तापमान 15 अंश सेल्सिअसवर गेलं आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. तर कमाल तापमान देखील 30 अंश सेल्सिअसवर गेलं आहे.
यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज मुंबईत झाली आहे. तापमानाचा पारा घसरला आहे. मुंबईत 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, उद्याही मुंबईत गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मुंबईत काल किमान तापमान 16 अंश सेल्सिअस होतं. तर आज त्यामध्ये पुन्हा घट झाली आहे. आज पारा 15 अंशावर गेला आहे.
उत्तर भारतातही थंडीचा कडाका
उत्तर भारतात थंडीचा कडाका (cold Weather) चांगलाच वाढला आहे. देशाची राजधानी दिल्लीतही थंडीत वाढ झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंडीचा जोर कायम राहणार आहे. तसेच धुके पडण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, आज सकाळी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये अनेक ठिकाणी दाट धुके पडल्याचे पाहायला मिळालं. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस विविध भागात दाट धुके राहण्याची शक्यता आहे. वायव्य मैदानी भागात कमी उष्णकटिबंधीय पातळीमध्ये जास्त आर्द्रता असणार आहे. त्याचा परिणाम हवामानावर दिसून येणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
दिल्लीत थंडी वाढणार
देशातील विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज (25 डिसेंबर) पहाटे हिमाचल प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओरिसा, आसाम आणि त्रिपुरामध्ये आणखी धुके पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये 25 आणि 26 डिसेंबर रोजी दिवसा आणि रात्री धुके कमी होईल. भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस पंजाब हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: