Mumbai Local Train Mega Block : मुंबईकरांनो (Mumbai) नाताळ (Christmas) निमित्त घराबाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज रविवारी, 25 डिसेंबरला नाताळच्या दिवशी मध्य रेल्वे (Central Railway Line) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (Harbor Railway Line) मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी मुंबई लोकलचं (Mumbai Local Train) वेळापत्रक तपासा आणि त्यानंतरच घराबाहेर पडा.
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Megablock on Central Railway Line)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 03.55 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबणाऱ्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि पुढे डाऊन स्लो लाईनवर वळवण्यात येतील.
सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 या दरम्यान घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock on Harbor Line)
- वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
- सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव रेल्वे मार्गावर कोणत्याही सेवेवर परिणाम होणार नाही.
- सकाळी 9.40 ते दुपारी 3.28 पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.03 ते दुपारी 3.54 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते दुपारी 4.30 या वेळेत ट्रान्स हार्बर/मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
- मेगा ब्लॉक कालावधीत पनवेल-मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.