Coastal Road Project : मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे-वरळी सी लिंक हा कोस्टल रोडचा दक्षिण भाग जून 2024 पर्यत वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे. मरिन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानच्या दक्षिण कोस्टल रोडचं काम नोव्हेंबर 2023 पर्यत पूर्ण होणार आहे. वरळी ते वांद्रे-वरळी सी लिंक इंटर कनेक्टसाठी पाच ते सहा महिने अधिकचा वेळ लागणार आहे. शिवाय वरळी समुद्रातील एक खांब कमी केल्याने 611 कोटीचा अधिकचा खर्च वाढणार आहे, कोस्टल रोड प्रकल्पाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर चंद्रकांत कदम यांनी ही माहिती दिली.


त्यांच्या माहितीनुसार, कोस्टल रोड प्रकल्पाचं काम 74.33 टक्के पूर्ण झालं आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील एका बोगद्याचं काम याआधीच पूर्ण झालं आहे तर टनेल बोरिंग मशीनच्या बिघाडानंतर सुद्धा दुसऱ्या बोगद्याचं काम आता दोन टक्के बाकी आहे. पहिल्या बोगदाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बोगदाचे काम 22 ते 25 मे दरम्यान पूर्ण होणार आहे. नोव्हेंबर 2023 ची डेडलाईनची याआधी दिली होती. हे काम पूर्ण होण्यासाठी ती डेडलाईन तशाच प्रकारे असेल. मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचं काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. तर वरळीपासून पुढे हा कोस्टल रोड-बांद्रा वरळी सी लिंकला जोडण्यासाठी अधिकचा वेळ लागणार आहे.


वरळीच्या समुद्रामध्ये एक खांब कमी केल्याने पूर्ण हा कोस्टल रोड वरळी वांद्रे सी लिंकला जोडण्यासाठी पाच ते सहा महिने अधिकचे लागणार आहेत. वरळीच्या भरावाचं काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल तिथून सी लिंकपर्यंतचं काम मे 2024 पर्यंत पूर्ण होईल. कोस्टल रोडचा वरळीच्या समुद्रातील 1 खांब कमी केल्याने दोन खांबांमध्ये 120 मीटरचं अंतर असणार आहे. त्यामुळे कोस्टल रोडचा खर्च 611 कोटींनी वाढणार आहे. दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12721 कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि त्यात 611 कोटींची वाढ होणार आहे. जून 2024 पर्यंत दक्षिण कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी खुला करण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल. मे पर्यंत कोस्टल रोड वरळी सी लिंकला जोडण्याचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर जूनपर्यंत वाहतूक या कोस्टल रोडवरुन सुरु करण्याचा प्रयत्न आहे.


दक्षिण आणि उत्तर भागात कोस्टल रोडची विभागणी


मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रियदर्शनी पार्क ते वरळी सीलिंग दरम्यान 10.58 किमी कोस्टल रोड बनवण्यात येत आहे. दरम्यान, एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे काम 72 टक्के पूर्ण झाले आहे. कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे दक्षिण भाग आणि उत्तर भाग. यामध्ये दक्षिण भागाचं काम अगोदर हाती घेतले आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान, जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे. जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हरपासून वरळी-वांद्रे सीलिंकपर्यंत आहे.


कसा असणार मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?



  • मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल

  • दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीला असून प्रकल्पाचा 70 टक्के काम पूर्ण झाले

  • प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असेल

  • एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे

  • यामध्ये 15.66 किमी चे  तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल

  • कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत आणि 34% इंजिन बचत होईल ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल