मुंबई: बीएमसीने जानेवारी 2024 मध्ये दक्षिण मुंबईतील सिमेंट काँक्रिट कॉन्ट्रॅक्टरचा करार रद्द केला तरी 30 दिवसांत कंत्राटदाराकडून 64.60 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात अपयशी ठरली आहे. अलीकडच्या काळात कंत्राट संपुष्टात आल्यानंतर कंत्राटदाराने बीएमसीला (BMC) लवादाकडे खेचल्याची ही पहिलीच घटना आहे. जानेवारी 2023 पासून केवळ 25 टक्के सीसी रस्त्यांचे काम (Road Construction) पूर्ण झाले असून बीएमसीने 1 जून रोजी स्टेटस रिपोर्ट प्रकाशित करणे आवश्यक असल्याचेही नार्वेकर म्हणाले. 


भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी शुक्रवारी बीएमसीचे प्रमुख भूषण गगराणी यांना पत्र लिहून लवादाची प्रक्रिया जलदगतीने मार्गी लावण्यासाठी विशेष सल्लागार नेमण्याची मागणी केली आहे.  नोव्हेंबर 2023 मध्ये, BMC ने RSIIL चे कंत्राट 52 कोटी रुपये दंड आकारून रद्द केला. मात्र त्याला कंत्राटदाराने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  त्यानंतर, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, बीएमसीने जानेवारी 2024 मध्ये प्रकरणाची पुन्हा तपासणी करून 64.60 कोटी रुपयांच्या दंडासह करार रद्द केला. शासनाची थकबाकी 30 दिवसांच्या आत भरावी, असे बीएमसीच्या आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटून गेले तरी, कंत्राटदाराने दंडाची थकबाकी भरलेली नाही, असे नार्वेकर म्हणाले. 


ठेकेदराने मुंबई महानगरपालिकेला कोर्टात खेचले


याप्रकरणात दंड भरण्याऐवजी ठेकेदाराने बीएमसीला लवादात खेचल्याचे कुलाब्याचे माजी नगरसेवक म्हणाले. दंडाच्या वसुलीसाठी बीएमसीने कंत्राटदाराविरुद्ध दिवाणी दावा दाखल करावा.  बीएमसी मात्र कंत्राटदाराला याबाबत दिरंगाई का करत आहे? बीएमसीने कंत्राटदारांसोबत कठोरपणे वागले पाहिजे. कारण त्यात करदात्यांचा पैसा गुंतलेला आहे, असे नार्वेकर म्हणाले.  


नार्वेकर यांनी पुढे शहरातील रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पांना होत असलेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित केला आणि बीएमसीकडून स्टेटस रिपोर्ट अहवालाची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व रस्ते काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना बीएमसीला केल्या होत्या.  मुंबईतील 2050 किमी रस्त्यांपैकी 1200 किमीचे रस्ते काँक्रिटचे आहेत, असे नार्वेकर म्हणाले. 


शहरात रस्त्यांची कामे सुरू झालेली नसताना, बीएमसीने पूर्व आणि पश्चिम उपनगरातील ३९७ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे कंत्राट दिले आहे. पावसाळ्यापूर्वी 40 टक्के कामे पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असले तरी आतापर्यंत केवळ 25 टक्केच कामे पूर्ण करण्यात यश आले आहे, अशी कबुली नार्वेकर यांनी दिली. 


ते पुढे म्हणाले की, जानेवारी 2023 मध्ये जेव्हा सीसी रस्त्यांचे कंत्राट देण्यात आले होते, तेव्हा 50 रस्तांची कामे घेणार होते आणि ते 2023 मध्ये पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार होते. तसेच ऑक्टोबर 2023 ते मे 2024 या कालावधीत 400 रस्त्यांचे काम करायचे होते. आणि शेवटचे 450 कामे ऑक्टोबर 2024 ते मे 2025 पर्यंत घेतले जातील. “या मुदतीत कामे पूर्ण झाली आहेत की नाही ह्यासाठी लवकरात लवकर स्टेटस रिपोर्ट प्रसिद्ध करावा,असे नार्वेकर म्हणाले.


आणखी वाचा


...तर मग मुंबईतील रस्ते बंद ठेवणार का? मुंबई महापालिकेच्या कारणांवर हायकोर्टाची नाराजी