मुंबई : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. गेल्या महापालिकेवेळच्या निवडणुकीत आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोरदार मुसंडी मारली होती आणि शिवसेनेला चांगलीच लढत दिली होती. त्यामुळेच शेलार यांच्याकडे पुन्हा एकदा ही जबाबदारी देण्यात आल्याचं समजतंय.


आशिष शेलार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात. मुंबई महापालिकेचं बजेट पाहता शिवसेना आणि भाजपसाठी ही महापालिका किती महत्त्वाची आहे हे लक्षात येतं. त्याचमुळे यावेळी काहीही करून महापालिका शिवसेनेच्या हातून काढून घ्यायचीच असा चंग भाजपने बांधला आहे. त्याचमुळे आशिष शेलार यांच्याकडे ही जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. 


आशिष शेलार यांची कारकीर्द


शिक्षण – बीएससी एलएलबी


• मुख्य प्रतोद, विधानसभा, 
• माजी मंत्री, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
• दोन टर्म अध्यक्ष, मुंबई भाजपा
• आमदार वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघ
• माजी अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशन 


राजकीय कारकीर्द


• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून काम
• सलग दोन टर्म,  सात वर्षे मुंबई भाजपाचे अध्यक्ष
• सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातून २६ हजार ९११ मताधिक्याने विजयी तर सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांंदा 26,550 मताधिक्य राखून
विजयी
• पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्टीय अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमितभाई शाह आणि तत्कलीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या सन 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाने 33 जागांवरून तब्बल 83 जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुंबई भाजपाचे नेतृत्व केले.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा  निवडणुकीपुर्वी सन २०१४ ला महार्गजना रॅली, बीकेसीतील मैदानत झाली त्याचे नियोजनात प्रमुख सहभाग आमदार ॲड आशिष शेलार याचे होते.  
• पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्टीय अध्यक्ष अमितभाई शाह आणि तत्कलीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या   लोकसभा 2014 व विधानसभेच्या निवडणुकांमध्येही मुंबईतून भाजपाला मोठे यश मिळाले त्यावेळीही आमदार अॅड आशिष् शेलार यांचे मुंबईतील नेतृत्व लक्षवेधी ठरलेतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे सहाही उमेदवार मोठया फरकाने विजयी झाले


अन्य पदे


• अभाविप, मुंबई सचिव
• भाजपा, युवा मोर्चा, मुंबई अध्यक्ष
• 1995 भाजपा महअधिवेशन कायर्कारिणी सदस्य (कोअर टीम)
• मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, खार पश्चिम
• भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष
• मुंबई महानगरपालिकेत भाजपा नगरसेवकांचे गटनेते
• सुधार समितीचे अध्यक्षपद भू्षविले
• सदस्य एमएमआरडीए
• मुंबई मेट्रो हेरीटेज सोसायटीचे गव्हर्नर
• वांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार.
• क्षत्रिय गडकरी मराठा महासंघाचे महाराष्ट्र समाज संस्थेमध्ये सक्रिय.