Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेने (Shivsena) या निर्णयाला विरोध केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात शिवसेना आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नगरविकास मंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर कसा काय बदलू शकतात, असा आक्षेप शिवसेनेने आहे. 


महाविकास आघाडी सरकारनं 9 वॉर्ड वाढवून मुंबई महापालिका वॉर्ड पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आरक्षण सोडतीसह सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ निवडणूक जाहीर होणे अपेक्षित असताना राज्य सरकारने निर्णय बदलला आहे. 2017 च्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. हे चुकीचे असल्याचे शिवसेनेनं म्हटलं आहे.


नगरविकास मंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर कसा बदलू शकतात, सेनेचा सवाल


मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. 2017 च्या प्रभाग  रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वूर्ण निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 2017  साली वॉर्ड संख्या ठरली होती तीच यंदाच्या निवडणुकीत कायम राहणार असल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. आता या निर्णयाला शिवसेनेनं विरोध केला आहे. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर कसा काय बदलू शकतात, असा सवाल देखील शिवसेनेने उपस्थित केला आहे. दरम्यान, थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 


दरम्यान, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या 'मार्मिक' या व्यंगचित्र साप्ताहिकाचा उद्या (13 ऑगस्ट) 62 वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे  उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता मातोश्री येथून फेसबुक लाईव्हद्वारे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर व्यंगात्मक फटकारे मारणार  का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: