Complaint Against Lalbaugcha Raja Mandal: मुंबईतील (Mumbai News) लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंडपात मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप होत आहे. खरंतर, लालबागच्या राजा (Lalbaugcha Raja 2023) मंडळात भाविकांची रांग प्रचंड मोठी असते. कित्येक तास या रांगेत उभं राहावं लागतं. अशातच काही वेळा गाभाऱ्यात प्रवेश करताना धक्काबुक्की होते. 


लालबागचा राजा मंडळाविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यावतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंडळाचे सदस्य आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये दररोज बाचाबाची होत असल्याची ही तक्रार असून,  व्हीव्हीआयपींना दर्शन देताना विशेष व्यवस्था पुरवली जाते, मात्र वृद्ध आणि लहान मुलांकरता कोणतीही विशेष व्यवस्था नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


तक्रारीत काय म्हटलंय? 


वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यावतीनं दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षीततेची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. मुख्यतः दर्शनासाठी येणाऱ्या वृद्ध, लहान मुलं आणि महिलांच्या सुरक्षेची खूप मोठ्या प्रमाणावर आबाळ होते. कुठेना कुठे त्यांना मोठ्या प्रमाणावर काही गोष्टींचा मनस्ताप सहन करावा लागतो. याच गोष्टी लक्षात घेऊन मंडळाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे. तसेच, येत्या काळात मुंबई पोलीस या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन ठोस कारवाई करतील, अशी अपेक्षा असल्याचंही तक्रारदारांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, गेल्या दोन दिवसांत लालबागच्या राजाच्या मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये हमरातुमरीचे आणि धक्काबुक्कीचे प्रसंग वारंवार ओढावल्याचं दिसून आलं. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण होत असल्याचा आरोप होत आहे. 



लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी, व्हिडीओ झालेत व्हायरल


देशासह राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganeshostav 2023) धामधूम सुरू आहे. अशातच मुंबईतील नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. याच लालबागच्या राजाच्या मंडपात (Lalbaugcha Raja Ganpati Mandal) तुफान गर्दी झाली आहे. अशातच गर्दी अनियंत्रित झाल्यानं मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाविक आणि कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 


पाहा व्हिडीओ : Lalbaugcha Raja 2023 : लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाची पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Mumbai News: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले