मुंबई : मुंबई आणि मुंबई उपनगर (Mumbai Corona Update) तिसर्‍या टप्प्यातून दुसर्‍या टप्प्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या निकषानुसार एका आठवड्यातच मुंबई दुसर्‍या टप्प्यात आली आहे.  मुंबईतील ऑक्सिजन बेडची उपलब्धता जास्त असल्याने आणि रुग्णवाढीची टक्केवारी घसरल्याने मुंबईचा समावेश दुसर्‍या टप्प्यात (Mumbai Unlock) करण्यात आला आहे.  मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती 100 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपस्थिती 100 टक्के ठेवण्याबाबत कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागानं आदेश काढले आहेत.  


पॉझिटीव्हिटी रेट साडेपाच टक्क्यांवरुन 4.40 टक्क्यांवर


मुंबईचा आठवड्याचा पॉझिटीव्हिटी रेट साडेपाच टक्क्यांवरुन 4.40 टक्क्यांवर आला आहे, मात्र, तरीही मुंबई लेव्हल 3 मध्येच राहणार आहे. सध्या तरी चालु नियमांमध्ये कोणताही बदल नाही.  पॉझिटीव्हिटी रेट स्थिर असेल तर नियम बदलण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आहे. मात्र, पॉझिटीव्हीटी दर घसरल्यानंतर सध्या तरी मुंबईला लेव्हल 3 चेच निकष लागू आहेत.  पुढील आदेश येईपर्यंत सध्या तरी मुंबईला लेव्हल 3 चे नियम लागू राहतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे. पॉझिटीव्हीटी रेटच्या स्थिरतेचा अभ्यास करुन आणि उपलब्ध बेडस् चा आढावा घेऊन मुंबई महापालिका चर्चेनंतर निर्णय जाहिर करेल. जर, मुंबईला लेव्हल 2 चे निकष लावायचे झाल्यास सोमवारपर्यंत याबाबत माहिती दिली जाईल, असं भिडे यांनी सांगितलं.


आकडेवारीनुसार मुंबई लेव्हल 2 मध्ये गेली असली तरी मुंबईत लेव्हल 3 चे च निर्बंध कायम राहणार आहेत. याची कारणं काय?



  • मुंबईतील लोकसंख्या घनतेचे प्रमाण जास्त

  • लोकल मधील गर्दी, एमएमआर परिसरातून मोठ्या संख्येनं मुंबईत येणारे प्रवासी 

  • हवामान विभागानं मुंबईला दिलेला  अतिवृष्टीचा इशारा 

  • त्यामुळे, पुढील सूचना येईपर्यंत सध्याचे निर्बंध कायम राहतील


Mumbai Corona Cases: मुंबईत आज 686 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर तर रुग्ण दुपटीचा कालावधी 596 दिवसांवर


ठाणे महानगरपालिकेचे अनलॉकनंतर नवीन नोटीफिकेशन जाहीर 
ठाणे महानगरपालिकेचे अनलॉकनंतर नवीन नोटीफिकेशन जाहीर कऱण्यात आले आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता लक्षात घेऊन level-2 मधील सर्व नियम जसेच्या तसे लागू राहणार आहेत. संध्या पॉझिटीव्हीटी रेट 7.83 टक्के आहे तर ऑक्सिजन बेड 82 टक्के रिकामे आहेत. त्यामुळे ठाणे महानगरपालिका अजूनही स्तर दोन मध्ये येत असल्याने आधीचे सर्व नियम लागू ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी जाहीर केले आहेत.


Maharashtra Unlock : राज्यात कोणत्या जिल्ह्यात निर्बंध कायम, कोणत्या जिल्ह्यात दिलासा? जिल्ह्यानिहाय पॉझिटिव्हिटी दर


मुंबईत गेल्या 24 तासात 696 कोरोनाबाधितांची नोंद
आता मुंबईतील आकडा हा एक हजारांच्या देखील आता आला आहे.  मुंबईत गेल्या 24 तासात 696 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 658  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,81,946 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील  एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 15,819 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 598 दिवसांवर पोहोचला आहे.