मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी साराला सतत फोन करुन, त्रास देणाऱ्या माथेफिरु तरुणाला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार नुकतीच सचिनने मुंबई पोलीसात दिली होती.
सचिन तेंडुलकरच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी सदर इसमाला पश्चिम बंगालच्या महिसादल येथून अटक केली.
देवकुमार मिद्दी असं व्यक्तीचं नाव असून, संबंधित व्यक्ती सचिनच्या मुंबईतील ऑफिसमध्ये बऱ्याच वेळा आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘मला साराशी लग्न करायचं आहे, असं हा इसम फोनवर सांगत होता,’ बऱ्याचदा समजाऊनही त्यानं फोन करणं सुरुच ठेवलं होतं. अखेर सचिननं मुंबई पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवली यानंतर पोलिसांनी कारवाई करत, या माथेफिरुला बेड्या ठोकल्या.
सचिनच्या मुलीला सतत फोनवरुन त्रास देणाऱ्या तरुणाला कोलकात्यात बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2018 03:17 PM (IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी साराला सतत फोन करुन, त्रास देणाऱ्या माथेफिरु तरुणाला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -