Aaditya Thackeray : गेल्या दोन तीन दिवसापासून घडत असलेल्या घडामोडी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी फार महत्वाच्या असल्याचे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या मुद्यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं. सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा टाईमपास सुरु आहे. त्यांनी लवकर निर्णय घ्यावा असे ठाकरे म्हणाले. तर मेट्रो कारशेड आणि रस्ते कॉन्ट्रॅक्टच्या मुद्यावरुन आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.  


आरेचे जंगल वाचावे हाच आमचा हेतू 


पहिल्यापासून आम्ही जे बोलत आलो ते सत्य होतं आणि सत्याचा विजय झाल्याचे अदित्य ठाकरे म्हणाले. मेट्रो 6 च्या कारशेडचे काम कांजूरमार्गला यावर्षीपासून सुरु होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही कांजुरमार्गला मेट्रो 6 चा कार डेपो करणार होतो. मेट्रो 6, मेट्रो 3 आणि 4 चा इंटिग्रेटेड कार डेपो करणार होतो. मात्र, खोके सरकारनं मेट्रो 3 चा कारडेपो आरेमध्ये नेल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यामध्ये आमचा कुठलाही इगो नव्हता. आमचा वैयक्तीक वाद नव्हता. आरेचे जंगला वाचावे हाच आमचा हेतू होतो असे आदित्य ठाकरे म्हणाले. चार डेपो जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा महाराष्ट्राचे कमीत कमी 10 हजार वाचले असते असे आदित्य ठाकरे म्हणाले. 4 जागा वेगळ्या कराव्या लागल्या नसत्या. आज कुठेही प्रशासनावर पकड नसलेले घटनाबाह्य मुख्यमंत्री काम करत आहेत. 


सरकार फक्त कॉन्ट्रॅक्ट देण्याचा काम करत आहे. आम्ही जेव्हा म्हणालो की काजूरमार्ग ची जागा राज्य सरकारची आहे तर केंद्र सरकार या विरोधात कोर्टात गेले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले की कांजुर मार्गची जागा राज्य सरकारची आहे, अधिवेशनात त्यांनी हे उत्तर दिल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही जे काम करणार होतो ते योग्य होतं.  इंटिग्रेटेड कारडेपो करणे योग्य होतं असे आदित्य ठाकरे म्हणाले. कांजूरमार्गची जागा मेट्रो 6 ला जर घेत असाल तर मेट्रो 4 आणि मेट्रो 14 लाइनसाठी इथेच कारडेपो करा जेणेकरून पैस कमी लागतील. कॉन्ट्रॅक्टर कमी लागतील असे आदित्य ठाकरे म्हणाले. 


रस्त्यांचं भूमिपूजन झालं, पुढे काय?


दुसरा विषय रस्त्याच्या काँट्रॅक्टचा आहे. जानेवारीमध्ये भूमिपूजन केलं, त्याचं पुढे काय झालं. रोडची काम कधी करता. 1 ऑक्टोबर ते 30 जून यामध्ये काम केलं जातं. आज बातम्या बघा, अजूनही एकाही रस्त्याची कामं सुरू केली नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्रीच्या मर्जीतली हे कंत्राटदार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. हा घोटाळा आहे. मुख्यमंत्र्यांना  काम करता येत नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की या काँट्रॅक्टरला पावसाळ्यात नोटीस देणार होते पण कोणाच्या तरी नातेवाईकांमुळे दिली नव्हती असे आदित्य ठाकरे म्हणाले. आता 1 ऑक्टोबर होऊन गेली तरी रस्त्याची कामे सुरूच नाहीत. जिथं आम्ही सांगतो चुकीचं होत आहे, त्यांनी आमचा थोडं तरी ऐकायला हवं असे आदित्य ठाकरे म्हणाले. 


दीड वर्ष झालं हे सरकार आलं आहे. या काळात खूप घोटाळे झाल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. आम्ही या सगळ्या घोटाळ्याविरोधात लोकायुक्ताकडे जाणार आहोत. आम्ही घोटाळेबाजांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नसल्याचे ठाकरे म्हणाले. 33 देशांनी खोके सरकारची नोंद घेतली आहे. नवी मुंबईत रखडलेले प्रकल्प आहेत. मुख्यमंत्री हे दिल्लीत असतात. त्यांना तिथून उद्घाटन करा असे सांगितले जाते. 
बाथरुमचे उदघाटन झालं तरी मुख्यमंत्र्यांचा फोटो लावतात. तुम्हाला वेळ नाही म्हणून उदघाटन थांबू नका असे आदित्य ठाकरे म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Politics: पोरखेळ करताय का? सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना झाप झाप झापलं!