Mumbai Air Quality Index :  मुंबई  प्रदूषणाच्या  (Mumbai Pollution) विळख्यात अडकली आहे. कारण सलग सहाव्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही खराब स्थितीत आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 300 पार गेला आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 319 नोंदवण्यात आलेला आहे. हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत असल्याने वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे दक्षिण आणि मध्य हवा ही वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे.


दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. अद्याप राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) 319 वर गेला आहे. म्हणजे अतिधोकादायक श्रेणीत मुंबईची नोंद झाली आहे. तर दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 308 वर आहे.  


चेंबूर आणि नवी मुंबईतील  हवा गुणवत्ता अतिधोकादायक स्थितीत


नवी मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक 362, अंधेरी 327, चेंबूर 352, बीकेसी 325, बोरीवली 215, वरळी 200, माझगाव 331, मालाड 319, कुलाबा 323, भांडूप 283 वर गेला आहे. चेंबूर आणि नवी मुंबईतील हवा गुणवत्ता अतिधोकादायक स्थितीत आहे. 


मास्कचा वापर करण्याचे आवाहन


मुंबईतील वाढत्या प्रदूषणासंदर्भात माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लानसंदर्भात सरकार गंभीर नाही, यासंदर्भात सरकारने काम देखील थांबवल्याची टीका होत आहे. मेट्रोची सुरु असलेली कामं, रस्त्यांवर वाढलेली वाहनांचा संख्या आणि धुळीच्या एकत्रित परिणामांमुळे परिस्थिती ढासळल्याचं निरीक्षण करण्यात आलं आहे. यामुळे आजारी लोकांना आरोग्यविषयक अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. वाईट श्रेणीतील हवा असलेल्या ठिकाणी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या काळात खासकरुन श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?



  • शून्य ते 50 एक्यूआय - उत्तम 

  • 50 ते 100 एक्यूआय - समाधानकारक 

  • 101 ते 200 एक्यूआय - मध्यम 

  • 201 ते 300 एक्यूआय - खराब 

  • 301 ते 400 एक्यूआय - अतिशय खराब 

  • 401 ते 500 एक्यूआय - गंभीर 


हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांचे जमिनीवर राहात असल्याने हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र  गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वाहनांच्या धुरामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे.  हवेतील धूलिकणांची वाढती पातळी ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे


संबंधित बातम्या :


Cold Wave : काळजी घ्या! हवेची गुणवत्ता ढासळली, फुफ्फुस आणि श्वसनाच्या आजारांचा धोका वाढला